अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक नियम १९९५ चे नियम क्रमांक ६(२)(४) अन्वये अत्याचारग्रस्त व्यक्तीस आणि त्याच्या साक्षीदारास पोलीस संरक्षण देण्याची कायद्यामध्ये तरतूद केलेली आहे.
अत्याचारग्रस्त व्यक्ती आणि साक्षीदार यांना जर असे वाटले किंवा योग्य कारण असेल तर ते विशेष कोर्टामध्ये पोलीस संरक्षण मिळण्याकरिता अर्ज करू शकतात. परंतु तिथे अर्ज करण्यापूर्वी त्यांना पोलीस स्टेशन मध्ये किंवा जिल्हा दंडाधिकारी यांच्याकडे अर्ज करावा लागतो
माहितीसाठी अर्जाचा नमुना सोबत जोडत आहोत
*अत्याचारग्रस्तास आणि त्याच्या साक्षीदारास पोलीस संरक्षण मिळण्याकरिता करावयाच्या अजांचा नमुना*
मा जिल्हा दंडाधिकारी/मा. पोलीस अधिक्षक, जिल्हा दंडाधिकारी कार्यालय /पोलीस अधिक्षक कार्यालय.
विषय:- अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक नियम १९९५ चे नियम क्रमांक ६(२)(४) अन्वये अत्याचारग्रस्त व्यक्तीस आणि त्याच्या साक्षीदारास पोलीस संरक्षण मिळणेबाबत
संदर्भ:
अत्याचार विशेष खटला क. / /
सरकार
विरुध्द
(आरोपीचे नाव )
(अर्जदार म्हणून ज्यांना संरक्षण हवे त्या अत्याचारग्रस्त व्यक्तीचे किंवा त्यांच्या साक्षीदाराचे नाव) _ _अर्जदार
प्रति,
महोदय,
वरिल विषयानुसार अर्ज सादर करण्यात येतो की दि. ______रोजी माझ्यावर/माझ्या आई-वडिलावर/माझ्या भावावर अत्याचार झाला आहे. त्याबाबतचा गुन्हा.______ या पोलीस स्टेशनमध्ये नोंदविण्यात आला आहे. या घटनेतील अत्याचारग्रस्त आणि अत्याचारग्रस्तांचे साक्षीदार यांना गुन्हेगार लोक व त्यांचे नातलग धमकी देत आहे. आणि अत्याचारग्रस्त आणि साक्षीदारांवर दडपण आणत आहेत. खटल्यामध्ये त्यांचे बाजूने साक्ष द्यावी असे असे सांगत आहेत. त्यांचे म्हणण्याप्रमाणे साक्ष दिली नाही तर ठार करु अशी धमकी दिली जात आहे.
म्हणून आपणांस अशी विनंती करण्यात येत आहे की, वरील अत्याचार विशेष खटल्याचा निर्णय लागे पर्यंत अत्याचारग्रस्त आणि त्यांच्या साक्षीदारास आणि त्यांचे कुटुंबीयांस अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक नियम १९९५ श्रे नियम क. ६(२) (४) अन्वये पोलीस संरक्षण पुरविण्यात यावे
येनेप्रमाणे विनंती अर्ज.
अर्जदार
सही
ठिकाण
दिनांक:
नाव पत्ता
अत्याचारग्रस्तानी नावे आणि साक्षीदारांची नावे सोबतच्या यादीप्रमाणे देणे.