ग्रामसेवकांची हजेरी बायोमॅट्रिक प्रणालीने लागुन करण्याबाबत ग्रामविकास विभागाने महाराष्ट्रातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना पत्राद्वारे सुचना दिली..
महाराष्ट्रातील जवळपास 90 % ग्रामपंचायतीने ग्रामसेवक ठरलेल्या कामाच्या दिवशी किंवा कार्यालयीन वेळेत कधीही ग्रामपंचायतमध्ये हजर राहत नाही, यामुळे महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरीक त्रासु गेलेले आहेत.
प्रति,
मा.
……………ग्रामपंचायत कार्यालय
विषय :- • ग्रामपंचायत कार्यालयात बायोमॅट्रीक हजेरी प्रणाली बसविणे बाबत….
संदर्भ 1:- दि.14/01/2023 रोजीचे रत्नागिरी टाईम्स वृत्तपत्रातील वरील विषया संर्दभात प्रसिद्ध बातमी.
संदर्भ 2 :क्र. संकीर्ण-२०२२/प्र.क्र.८६७/आस्था-७
दिनांक : ०५ जानेवारी, २०२३
संदर्भ3 : क्र. संकीर्ण-२०२३/प्र.क्र.४५३ /आस्था-७
२४ ऑगस्ट २०२३
अर्जदाराचे नाव:
पत्ता:
मो.नं.
ई-मेल
महोदय / महोदया,
राज्यातील अनेक ग्रामपंचायती मध्ये असे निर्दशनास येत आहे कि, ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी ग्रामस्थांना अनेकदा कार्यालयात भेटत नाहीत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या कामाचा अणि वेळेचा खोळंबा होतो. याला आवर करण्यासाठी आता कोकणातील ग्रामस्थांच्या तक्रारीची दखल घेत राज्याच्या ग्रामविकास विभागाने दिनांक 5 जानेवारी 2023 रोजी एका पत्राद्वारे राज्यातील कोकण पुणे नाशिक औरंगाबाद अमरावती, नागपुर विभागिय आयुक्तांना ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांना ग्रामपंचायत कार्यालयात बायोमॅट्रीक हजेरी प्रणाली लागु करण्याचे निर्देश दिले आहेत व प्रवेश द्वारावर जन माहीती अधिकारी फलक लावण्याबाबत सांगण्यात आले आहे.
वरील संदर्भिय पत्राचा आशय लक्षात घेता आपल्या ग्रामपंचायतीच्या कारभारात | पारदर्शकता येण्याच्या हेतूने व ग्रामसेवेकांच्या कार्यप्रणालीत सुधारणा व्हावी म्हणुन आपल्या ग्रामपंचातीमध्ये विनाविलंब बायोमॅट्रीक हजेरी प्रणाली बसविण्यात यावी हि विनंती.
कळावे,
अर्जदाराची सही