एखाद्या पोलिसांनी व्यक्तीला संशयित अथवा साक्षीदार म्हणून पोलीस ठाण्यात बोलावताना केवळ पोलिसाला पाठवून बोलावणे नियमवाह्य आहे.“`
यापैकी कोणत्याही कारणासाठी पोलीस स्टेशला बोलावताना त्या व्यक्तीला लेखी नोटीसही देणे बंधनकारक असून त्याचे काटेकोर पालन झाले पाहिजे, असे एका प्रकरणात राज्य मानवी हक्क आयोगाने पोलिसांना बजावले आहे.
संदर्भात सीआरपीसी कायद्यातील कलम १६० मध्ये ही अट घातली असून १६ ऑगस्ट, २००८ रोजी पोलीस आयुक्तांनी परिपत्रक काढून सर्व पोलीस ठाण्यांना आदेश दिले आहेत. मात्र कायद्याच्या तरतुदीकडे पोलीस अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष होत.