ज्ञानमाता सेवाभावी संस्थापक अध्यक्ष अब्राहम आढाव यांनी दिनांक २७ जून २०२४ रोजी गोवा एक्सप्रेस ट्रेन नंबर १२७८० द्वारे दिल्ली ते पुणे प्रवास केला होता.
सदर प्रवास दरम्यान ६ चहा आणि एक पाणी बॉटल खरेदी केली होती.
Irctc विक्रेता याच्याकडे चहाचे बिल मागितले असता त्याने ६ चहाचे ६० रू बिल दिले.
बिल प्रिंटेड होते. ते बिल डिप चहाचे ( Tea with tea Bag ) होते माझ्या लगेच निर्दशनास आले. सदर बिल चा फोटो काढून घेतला तसेच साधा घेतलेला चहा याचा ही फोटो घेतला.जे पाणी पिण्यासाठी घेतले होते.
पाणी बॉटल ची किंमत २० रू आहे असे त्याने सांगितले त्या रेल नीर विक्रेता याला पेमेंट फोन पे द्वारे २० ₹ दिले. बिल ची मागणी केली तर बिल देण्यास नकार दिला
सदर ऑनलाईन तक्रार दाखल करताच सत्यम केटरर्स चा पर्यवेक्षक यांनी तक्रार मागे घेण्याची विनंती केली.
स्टँडर्ड १५० मिली. चहा हा ५ ₹ ला आहे . आणि विक्रेता यांनी आमची फसवणूक करून डीप चहाचे बिल दाखवून जास्त पैसे घेतले. हे मी चहाच्या फोटो आणि बिलासह रेल्वे वरिष्ठ अधिकारी यांच्या निर्दशनास आणून दिले.
रेल्वेत स्टेशन वर आणि ट्रेन मध्ये विकला जाणारा चहा हा ५ रू आहे हे अनेकांना आज ही माहित नाही.
तसेच डीप चहा हा १० ₹ आहे.
रेल नीर ची किंमत १५ रू आहे.
मी २७ जून रोजी ऑनलाईन तक्रार दाखल केली.
त्यावर दिनांक १७/९/२४ रोजी इंडीयन रेल्वेकडे ऑनलाईन आर टी आय दाखल केला.
त्यावर पी आय ओ ने दिनांक ३/१०/२४ रोजी रिप्लाय दिला त्यावर फक्त दंड आकाराला आहे अशी माहिती दिली.
दंड किती आकाराला यावर मी जनरल मॅनेजर यांना एक ईमेल केला त्यावर २५००० दंड घेण्यात आला असे सांगितले पण त्याचे काही दस्त मात्र दिले नाही.
म्हणून मी ४ ऑक्टोबर रोजी प्रथम अपील दाखल केले.
सदर प्रकरणाची चौकशी करून प्रथम अपील अधिकारी ने आज दिनांक ९/१०/२४ रोजी निर्णय दिला .
आणि आकारलेला २५००० दंड याचे सविस्तर दस्त आणि GST अशी पूर्ण माहिती दिली.
गोवा एक्सप्रेस ( ट्रेन न .१२७८०)मध्ये कॅटरिंग ची सेवा देणारां Satyam Caterers यांच्याकडून GST सह दंड आकारण्यात आला आहे.
ग्राहकाकडून जास्त रक्कम घेणे तसेच बिल मागून ही न देणे या कारणास्तव
दंड २५०००+ GST ४५०० असे एकूण २९५०० रू. आकारले आहेत.