*ग्रामपंचायत कर आकारणी*
जागरूक व्हा…..आपल्या हक्कासाठी आपल्याला च संघर्ष करावं लागतं….हे दुर्भाग्य….. लढा आपल्या हक्कांसाठी.
*नमुना नंबर 10*
*कर फी पावती*
मालमत्ता कर मध्ये शासनाच्या आदेशनुसार करदात्यांना ५% सूट मिळावी.ग्रामीण भागातील जनतेची फसवणूक थांबली पाहिजे… त्याचे अधिकार त्यांना मिळाले पाहिजे….. ग्रामसेवक/ग्रामपंचातीतर्फे या बाबत जनजागृती होताना दिसत नाही.
शासनाच्या नियमाप्रमाणे मालमत्ता धारकांना मालमत्ता कर आर्थिक वर्षातील *सहा महिने* आत कर दात्याने *संपूर्ण कर भरला* असेल तर तो कर दाता कराच्या रकमेवर *पाच टक्के* इतक्या प्रमाणात सूट घेण्यासाठी हक्कदार असेल असं जाहीर केले आहे.परंतु आपल्या ग्रामपंचायत मध्ये याबाबत सूट देत नाही हा कोणता कायदेशीरपणा आहे याबाबत ग्रामसेवक यांनी योग्य ती अंमलबजावणी करावी.
कर आकारणी करण्यात येणान्या आर्थिक वर्षांतील पहिल्या सहा महिन्यांत करदात्याने संपूर्ण कर भरला असेल तर तो करदाता
कराच्या रकमेवर ५% इतक्या प्रमाणात सूट देण्यासाठी हक्कदार असेल.
*आदेशाची प्रत /राजपत्रक सोबत जोडलेली आहे*
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब डिसेंबर ३१, २०१५/पौष
१०, शके १९३७