ग्रामपंचायत कारभाराची पारदर्शकता तपासण्यासाठी विविध विषयांची यादी.

Spread the love

ग्रामपंचायत कारभाराची पारदर्शकता तपासण्यासाठी विविध विषयांची यादी देत आहोत.

सर्व सुशिक्षित तरुणांनी या विषयावर माहिती मागवत गावातील ग्रामस्थांना, ग्रामपंचायत कारभाराविषयी माहिती द्यावी, तसेच अपेक्षित सुधारणांसाठी आग्रह धरावा. #ग्रामपंचायत…

1) ग्रामपंचायत #अर्थसंकल्प विषयक बाबींची माहिती व तपशिल मिळवा.

2) ग्रामपंचायत ने #अर्थसंकल्पामध्ये काही सुधारणा केल्या असल्यास त्याबाबत माहिती मिळवा.

3) ग्रामपंचायत ने जमा केलेली रक्कम आणि #खर्च केलेली रक्कम याबाबत माहिती मिळवा

.

4) ग्रामपंचायत मध्ये #थकीत असलेल्या किंवा येणे बाकी असलेल्या रक्कमांचा तपशिल मिळवा.

5) ग्रामपंचायत च्या #आर्थिक बाबींचा तपशिल मिळवा.

6) पावत्या व वाटप केलेल्या रकमांचा तापशिल मिळवा.

7) ग्रामपंचायत मधील #जमा रकमांची तपासणी करा व आवश्यक त्या प्रतींची झेरॉक्स किंवा फोटो कॉपी मिळवा.

😎 #ग्रामपंचायतीस प्राप्त झालेल्या रकमेचा तपशिल, आवश्यक त्या प्रतींची झेरॉक्स किंवा फोटो कॉपी मिळवा.

9) ग्रामपंचायत #करास पात्र असलेल्या बाबींचा तपशिल पाहा व आवश्यक त्या प्रतींची झेरॉक्स किंवा फोटो कॉपी मिळवा.

10) ग्रामपंचायत द्वारा निश्चित #कर दात्यांची माहिती तपास व आवश्यक त्या प्रतींची झेरॉक्स किंवा फोटो कॉपी मिळवा.

11) कर मागणी #पावती बुकाची माहिती पहा..

12) ग्रामपंचायतीस कोणी #कर भरला किंवा कसे हे याबाबत माहिती मिळवा.

13) ग्रामपंचायत द्वारा किरकोळ बाबींसाठी मागण्यात आलेल्या रकमांची तपशिल मिळवा.

14) ग्रामपंचायत ने केलेल्या #खर्चाचा तपशील मिळवा.

15) ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या नियुक्ती व #पगार याबाबत माहिती मिळवा.

16) ग्रामपंचायत द्वारा खरेदी व विक्री केलेल्या #मुद्रांक याबाबत माहिती मिळवा.

17) ग्रामपंचायत ने #खरेदी केलेल्या बाबींचा तपशिल मिळवा.

18) ग्रामपंचायत च्या जंगम #मालमत्ते बाबत माहिती मिळवा.

19) ग्रामपंचायत ने कोणत्याही बाबींसाठी सुरक्षा ठेव ठेवली असल्यास किंवा परत केली असल्यास याबाबत चा तपशिल मिळवा.

20) ग्रामपंचायत द्वारा #किरकोळ रित्या अदा केलेल्या रकमांचा तपशिल मिळवा.

21) ग्रामपंचायत द्वारा रोजंदारीवर लावलेल्या मजुरांचा #हजेरीपट याबाबत तपशिल मिळवा.

22) ग्रामपंचायत ने कोणत्याही कामासाठी काढलेल्या #अंदाजित खर्चाचा तपशील मिळवा.

23) ग्रामपंचायत ने कोणत्याही #कामासाठी रक्कम अदा केली असल्यास त्या बाबींचा तपशिल मागवा.

24) ग्रामपंचायत ने किंवा #ठेकेदाराने केलेल्या विकास कामाच्या मोजमाप पुस्तकाचा तपशिल मिळवा.

25) #मोजमाप पुस्तकाच्या आधारे अदा केलेल्या रकमांचा तपशिल मिळवा.

26) ग्रामपंचायत मध्ये कायम स्वरुपी नेमणुकीस असलेल्या कर्मचाऱ्यांचे #पगार व भत्ते आणि #वेतन श्रेणीचा तपशिल मिळवा.

27) ग्रामपंचायत च्या स्थावर #मालमत्तेचा तपशील मिळवा.

28) ग्रामपंचायत च्या हद्दीत असलेल्या #रस्त्यांचा तपशिल मिळवा.

29) ग्रामपंचायत द्वारा #खरेदी किंवा संपादित केलेल्या, गायरान जमिनींची माहिती मिळवा.

30) ग्रामपंचायत द्वारा #गुंतवणूक केली असल्यास त्या बाबींचा तपशिल मिळवा.

31) ग्रामपंचायत द्वारा केलेल्या खर्चाचे मासिक विवरण मिळवा.

32) ग्रामपंचायत मध्ये जमा झालेल्या रकमांचे मासिक विवरण मिळवा.

33) #लेखा परीक्षण यातील आक्षापांच्या पूर्ततेचे विवरण मिळवा.

34) #मागासवर्गीय व बालकल्याण साठी करावयाच्या #खर्चाचे विवरण मिळवा.

35) ग्रामपंचायत ने घेतलेले #कर्ज व इतर बाबींचा तपशिल मिळवा.

36) ग्रामपंचायत च्या #लेखापरीक्षण विषयक बाबींचा तपशिल मिळवा

37) कार्यालयीन कामासाठी केलेल्या प्रवासासाठी #प्रवासभत्ता दिला असल्यास त्याबाबत चा तपशिल मिळवा.

38) ग्रामपंचायत ने सुरक्षा ठेव अनामत परत केली असल्यास त्याबाबत चा तपशिल मिळवा.

39) ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या #वृक्ष व त्यापासून मिळणाऱ्या उत्पन्नाचा तपशिल मिळवा.

40) #ग्रामपंचायतच्या मासिक सभेचा तपशिल मिळवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *