*पुणे शहरात माहिती अधिकार कायद्याचे विशेष ऑफलाइन प्रशिक्षण
पणे, प्रतिनिधी – माहितीचा अधिकार हा लोकशाहीसाठी महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. नागरिकांना या अधिकाराची संपूर्ण माहिती मिळावी आणि प्रशासन पारदर्शक व्हावे, यासाठी ज्ञानमाता माहिती अधिकार प्रशिक्षण केंद्र, पुणे यांच्या वतीने माहिती अधिकार कायद्याचे विशेष ऑफलाइन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण ८ फेब्रुवारी २०२५ रोजी बाळासाहेब ठाकरे कला दालन, स्वारगेट, पुणे येथे होणार आहे.
या प्रशिक्षणात माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ मधील कलम १ ते ३१ यावर सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे. महाराष्ट्रभर ऑनलाईन आणि ऑफलाइन स्वरूपात माहिती अधिकाराचे प्रशिक्षण देणाऱ्या ज्ञानमाता माहिती अधिकार प्रशिक्षण केंद्राने अनेक नागरिक आणि शासकीय अधिकारी प्रशिक्षित केले आहेत.
प्रशिक्षणाची वैशिष्ट्ये:
✅ माहिती अधिकार कायद्याचा संपूर्ण अभ्यास
✅ नामांकित तज्ज्ञांचे मार्गदर्शन
✅ वातानुकूलित हॉल आणि उत्तम सोयीसुविधा
✅ सहभागी प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र
प्रशिक्षण का आवश्यक?
माहितीचा अधिकार कायदा लागू होऊन १९ वर्षे पूर्ण झाली असली, तरी अद्याप अनेक नागरिकांना त्याचा पुरेसा वापर करता येत नाही. त्यामुळे शासकीय कार्यालयांमधून माहिती मिळण्यात अडचणी येतात. लोकशाहीमध्ये नागरिकच खरे मालक असून सरकारी तिजोरीवरील जनतेचे संपूर्ण नियंत्रण असावे, यासाठी हा कायदा महत्त्वाचा आहे.
पुण्यातील नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि माहिती अधिकार कायद्याच्या प्रशिक्षणासाठी तत्काळ नोंदणी करावी, असे आवाहन ज्ञानमाता माहिती अधिकार प्रशिक्षण केंद्रातर्फे करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी आणि नोंदणीसाठी 9890242364 यावर त्वरित संपर्क साधा!