*दप्तर दिरंगाई कायदा 2006 वर विशेष ऑफलाइन प्रशिक्षण – नागरिकांसाठी सुवर्णसंधी*!
पुणे: माहिती अधिकार कायदा 2005 लागू होऊन अनेक वर्षे झाली, तरी अद्याप काही शासकीय कार्यालयांमध्ये पारदर्शकता आणि कार्यक्षमतेचा अभाव दिसून येतो. नागरिकांची कामे वेळेत न होणे, जाणून-बुजून दिरंगाई करणे, तसेच माहिती उशिरा देणे या समस्यांवर उपाय म्हणून दप्तर दिरंगाई कायदा 2006 लागू करण्यात आला.
या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत जनजागृती करण्यासाठी ज्ञानमाता माहिती अधिकार प्रशिक्षण केंद्र, पुणे यांच्या वतीने २ मार्च २०२५ रोजी श्री.बाळासाहेब ठाकरे कलादालन, स्वारगेट, पुणे येथे विशेष ऑफलाइन प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
प्रशिक्षणाचे वैशिष्ट्ये:
दप्तर दिरंगाई कायदा 2006 चे सखोल ज्ञान
प्रशस्त वातानुकूलित हॉल
भव्य पार्किंग
डॉल्बी साऊंड सिस्टीम
शासकीय कार्यालयांतील विलंब आणि दिरंगाईविरुद्ध कायदेशीर उपाय
माहिती अधिकार कायद्याचा योग्य वापर
नागरिकांना वेळेत सेवा मिळण्यासाठी कायद्यातील तरतुदी
महाराष्ट्र नागरिक सेवा स्थायी आदेश 1979 नुसार शासकीय कर्मचाऱ्यांवर होणारी कारवाई
प्रशिक्षण कोणासाठी?
माहिती अधिकार कार्यकर्ते
सामाजिक कार्यकर्ते
पत्रकार
वकिल
सर्वसामान्य नागरिक
या प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी इच्छुकांनी 9890242364 या क्रमांकावर संपर्क साधून आपली नोंदणी त्वरित करावी.
नागरिकांचे हक्क मजबूत करण्यासाठी एक पाऊल पुढे!
हा उपक्रम नागरिकांना सक्षम बनवण्यासाठी आणि शासकीय यंत्रणेत पारदर्शकता आणण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. शासकीय कार्यालयांतील दिरंगाईविरुद्ध लढण्यासाठी हे प्रशिक्षण उपयुक्त ठरेल.
नोंदणी करून आजच आपले हक्क जाणून घ्या आणि माहिती अधिकार कायद्याला अधिक बळकट करा!