३५० वा शिवराज्याभिषेक बोधचिन्हाचा शासकीय कार्यालयात वापर सुरू करा सामाजिक कार्यकर्ते दीपक पाचपुते यांची निवेदनाद्वारे प्रशासनाकडे मागणी

Spread the love

 

३५० वा शिवराज्याभिषेक बोधचिन्हाचा शासकीय कार्यालयात वापर सुरू करा सामाजिक कार्यकर्ते दीपक पाचपुते यांची निवेदनाद्वारे प्रशासनाकडे मागण

अहिल्यानगर:प्रतिनिधी ३५० शिवराज्याभिषेक वा निमित्त शिवकालीन मंगल चिन्हे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम, शौर्य अधोरेखित करणाऱ्या विशेष बोधचिन्हाचे लोकार्पण करण्यात आले आहे. छत्रपती शि- वाजी महाराज यांच्या विचारांचा जागर पुन्हा मराठी मनामनात व्हावा , जगभरात जेथे जेथे मराठी माणूस आहे, तेथे व या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार तसेच त्यांच्या बद्दलची माहिती पोहोचावी, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय निर्गमित केला आहे.

 

 

शिवकालीन मंगल चिन्हे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम, शौर्य अधोरेखित करणाऱ्या बोधचिन्हाचा शासनाच्या सर्व शासकीय कार्यक्रमाच्या प्रचार, प्रसिध्दीत तसेच शासकीय पत्रव्यवहारांत कटाक्षाने वापर करण्यात यावा.

तसेच सर्व शासकीय कार्यालयांमध्ये दर्शनी भागात सदर बोधचिन्ह चित्रीत करण्यात यावे, असे महाराष्ट्र शासन पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, शासन निर्णयानुसार शासन निर्णय निर्गमित करुन शासनाकडून सूचना देण्यात आलेल्या आहेत.

नमुद केलेल्या सर्व सुचनांची काटेकोरपणे व तात्काळ अंमलबजावणी सुरू करण्यासाठी प्रशासकीय विभाग विशेषता अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालय प्रमुख, विभाग प्रमुख यांना आदेश देण्यात यावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिपक पाचपुते यांनी निवेदनाद्वारे प्रशासनाकडे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *